आयपीएल २०२२ (ipl 2022) स्पर्धेतील ४१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत हे दोन्ही संघ १० एप्रिल रोजी आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला ४४ धावांनी पराभूत केले होते.
तसेच दोन्ही संघांच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत, ज्यात या संघाला ३ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ८ पैकी ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे. हा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान
कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव, टीम साऊदी.
या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम
रिषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, उमेश यादव, टीम साऊदी
कर्णधार - आंद्रे रसेल
उपकर्णधार - डेविड वॉर्नर
