बाईक स्टंट्स-ज्यांना व्हीली पण म्हटलं जातं यात नेहमी मुलंच पुढे असतात. ’धूम स्टाईल’ गाड्या सुसाट पळवणं, मागच्या एकाच चाकावर गाडी चालवणं, चालत्या गाडीवर कसरती करणं हे असले जीवघेणे खेळ मुलं करत असतात.
मुली मात्र सहसा या भानगडीत पडताना दिसत नाहीत. अर्थात, आ्ता चित्र बदलतंय. ’रब ने बना दी जोडी’ मधली अनुष्का, ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मधली कतरिना आणि आपली सैराट आर्ची या मुली बिन्धास्त बाईक चालवताना दाखवल्या आहेत. पण या वरच्या व्हिडिओमधली मुलगी सर्वांना पुरून उरतेय. पण असे स्टंट्स करताना सावधान. जीवावरचा खेळ आहे हा!!
