क्रिकेटसाठी भारतात असलेले वेड किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.क्रिकेटपटू बॉलीवूड स्टार्स एवढेच लोकप्रिय भारतात आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या नावावरून मुलांचे नाव ठेवले असेही बरेच लोक सापडतील.मात्र आज ज्यांची गोष्ट तुम्ही वाचणार आहात, त्यांची कहाणी मात्र चांगलीच भन्नाट आहे.
रवी कृष्णमूर्ती हे मूळ बंगलोरचे असलेले गृहस्थ आपल्या पत्नीला सोबत घेऊन १९९० साली न्यूझीलंडला स्थायिक झाले. येथील वेलींग्टन या शहरात त्यांनी हट हॉक्स क्लब नावाची कंपनी सुरू केली. देश सोडला तरी इतर अनेक भारतीयांप्रमाणे क्रिकेटबद्दल त्यांचे प्रेम अबाधित होते.


