जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर हे वाक्य वाचल्याबरोबर अनेकांच्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनीचा चेहरा आला असेल. पण धोनीच्या नजरेसमोर पुढचा 'मॅच फिनिशर' म्हणून एक चेहरा आहे हे सिद्ध करणारा एक फोटो सध्या वायरल होत आहे. शाहरुख खान हा तो मॅच फिनिशर आहे.
आता हा शाहरूख खान केव्हापासून क्रिकेट खेळायला लागला असे तुम्ही म्हणत असाल तर हा शाहरुख वेगळा आहे. हा क्रिकेटर शाहरुख आहे. सईद मुश्ताक अली ट्रॉफी फायनल नुकतीच पार पडली. T-20 मधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा!!! यावेळी तामिळनाडूने फायनलमध्ये कर्नाटकचा पराभव केला.


