तुम्ही एमएस धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला एमएस धोनी 'द अन्टोल्ड स्टोरी' हा चित्रपट अनेकदा पाहिला असेल. या चित्रपटात धोनीच्या बालपणापासून ते वर्ल्ड कप विनिंग सिक्स पर्यंत सर्व काही दाखवण्यात आले आहे. मात्र काही अशा गोष्टी असतात ज्या राहून जातात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे, एमएस धोनीचे शालेय जीवन. क्रिकेटच्या मैदानात मास्टरमाईंड असणार धोनी अभ्यासात कसा होता? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने आपल्या शालेय जीवनातील किस्सा सांगितला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्याने भारतीय संघाला आयसीसी टी -२० विश्वचषक २००७, आयसीसी वनडे विश्वचषक २०११ आणि २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. भारतीय संघासह त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी देखील जोरदार कामगिरी केली होती.
नुकताच त्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्याने आपल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेबाबत मनोरंजक किस्सा सांगितला. त्याने म्हटले की, "मला खूप आनंद झाला होता. कारण माझ्या वडिलांना वाटत होतं की, माझ्याकडुन हे नाही होऊ शकत. मी नापास होणार आणि परत परीक्षा द्यावी लागेल. मात्र त्यांना जेव्हा समजलं की, मी उत्तीर्ण झालो आहे, तेव्हा ते खूप खुश झाले होते."
धोनीचा आवडता विषय कोणता?
एमएस धोनीला जेव्हा विचारण्यात आले की, तुझा आवडता विषय कोणता? त्यावेळी त्याने क्षणही न दवडता उत्तर देत म्हटले की, 'खेळ' याबाबत बोलताना तो म्हणाला की, "खेळ हा विषय म्हणून पात्र आहे का? मी सातवीत असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी मी साधारण विद्यार्थी होतो. मात्र त्यानंतर माझी हजेरी कमी होऊ लागली. मी दहावीत असताना ६६ टक्के गुण मिळवले होते. तर बारावीत असताना ५६,५७ टक्के गुण मिळवले होते."
हा धोनीच्या शालेय जीवनातील रोमांचक किस्सा होता. तुम्हाला धोनीच्या आयुष्यातील आणखी काही रोमांचक किस्से वाचायला आवडतील का? कमेंट करून नक्की कळवा.
