नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा गोलंदाजी करण्याचा निर्णय; अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा गोलंदाजी करण्याचा निर्णय; अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११

श्रीलंका संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा टी२० सामना धर्मशाळा येथे सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये. तर श्रीलंका संघात दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. नाणेफेक झाल्यानंतर रोहित शर्माने धावांचा पाठलाग करण्याबाबत भाष्य केले आहे. तसेच हा सामना जिंकून भारतीय संघ २-० ची विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ 

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

श्रीलंका : पथुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दनुष्का गुनथिलका, दिनेश चंडिमल (यष्टिरक्षक), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रवीण जयविक्रम, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा