WWE चा सुपरस्टार जॉन सीना ने काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
आणि नेहमीप्रमाणे आपले इंटरनेट कोलमडले. हा काय प्रकार आहे याचे अनेक तर्क वितर्क पुढे येऊ लागले.

पण आता याचे खरे कारण आम्हाला कळलंय. तर गंमत अशी आहे, गेल्या आठवड्यात WWE मध्ये प्लेयर ड्रॉफ्ट झाला. खेळाडू रॉ आणि स्मॅक डाऊन मध्ये वाटल्या गेले. त्यात जॉन सीना च्या वाटी स्मॅक डाऊन आलं आणि त्यांचा कलर आहे ब्लु. म्हणून त्याने ब्लिड ब्लु हि इमेज टाकली आणि त्यात कर्मधर्मसंयोगाने निघाला विराट.
तर मंडळी कोणतीही मोठी गोष्ट नाहीए, हा केवळ एक योगायोग होता.
