खेळ कुठलाही असो, मैदानावर जिंकण्यासाठी खेळाडू उत्तम खेळण्यासोबतच अनेक छक्केपंजेही कारताना दिसतात. क्रिकेटच्या मैदानावर दिसणारा स्लेजिंग हा प्रकार तर सर्वाना माहीत आहे. फुटबॉल मैदानावर पण पाय अडवणे, धक्के देणे असे प्रकार घडत असतात. या सर्व प्रकारात प्रेक्षकांची भूमिका ही फक्त बघण्यापुरतीच असते. मैदानाबाहेर राहून ते काही करू पण शकत नाहीत. मात्र फुटबॉलमधली प्रतिष्ठेची स्पर्धा युरो चषकात एका प्रेक्षकाने केलेला प्रकार पाहून लोकांना धक्का बसला आहे.
बुधवारी वेम्बले स्टेडियमवर डेन्मार्क आणि इंग्लंडदरम्यान सेमी फायनल सामना सुरू होता. त्यावेळी डेन्मार्कचा गोलकीपर kasper schmeichel हा पेनल्टी वाचविण्याच्या तयारीत असताना मैदानावरील प्रेक्षक गॅलरीतून एका प्रेक्षकाने त्याच्या डोळ्यावर लेझर लाईट चमकवला. Kasper तरीही स्पॉट किक रोखण्यात यशस्वी ठरला.

