या कारणामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सकाळच्या सत्रातील लढती रद्द!!

या कारणामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सकाळच्या सत्रातील लढती रद्द!!

गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यातील (satara) छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (Chatrapati shahu zilha krida sankul) महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच यंदा महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रेक्षक सामने पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. परंतु गुरुवार (७ एप्रिल) पासून सकाळच्या सत्रातील सर्व लढती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे यामागील कारण चला जाणून घेऊया.

वातावरण अतिउष्ण होत असल्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सर्व लढती रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कुस्ती (Maharashtra kusti) परिषदेने हा निर्णय घेतला आहे. 

सकाळच्या सत्रातील सामने सुरू असताना कुस्तीपटुंना उष्णतेचा त्रास होत होता. तसेच उष्णतेचा पारा हा ४०° सेल्सिअसच्या पार गेला होता. ज्यामुळे मॅट देखील भरपूर तापले होते. ही परिस्थिती पाहता, लढती संध्याकाळच्या सत्रात खेळवण्यात येणार आहेत. संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार आज (७ एप्रिल) सायंकाळी महाराष्ट्र केसरीसह अन्य वजनी गटातील लढती होतील.