मुंबईने रचला इतिहास! ७२५ धावांनी विजय मिळवत मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम...

मुंबईने रचला इतिहास! ७२५ धावांनी विजय मिळवत मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम...

मुंबई संघाने (Mumbai ranji team) रणजी ट्रॉफी स्पर्धेत आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई संघ आता धावांचा बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी (९ जून) केएससीए मैदानावर रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेत क्वाटर फायनलचा (Ranji trophy quarter finals) सामना पार पडला. या सामन्यात मुंबई संघाने उत्तराखंड संघाला ७२५ धावांनी पराभूत केले. यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम न्यू साऊथ वेल्स संघाच्या नावे होता. या संघाने जानेवारी १९३० मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात क्विंसलॅंड संघाला ६८५ धावांनी पराभूत केले होते.(Mumbai vs uttarakhand)

या सामन्यातील पहिल्या डावात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद ६४७ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यात सुवेद पारकरने (Suved parkar) सर्वाधिक २५२ तर सरफराज खानने (Sarfaraz Khan) १५३ धावांची खेळी केली होती. या धावांचे पाठलाग करण्यासाठी आलेल्या उत्तराखंड संघाला पहिल्या डावात अवघ्या ११४ धावा करता आल्या. मुंबई संघाला दुसऱ्या डावात मोठी आघडी मिळाली होती. या आघाडीचा फायदा घेत मुंबई संघाने दुसऱ्या डावात ३ गडी २६१ धावा केल्या आणि डाव घोषित केला. उत्तराखंड संघाला विजयासाठी ७९५ धावांचे आव्हान होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तराखंडच्या फलंदाजांना एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उत्तराखंडचा दुसरा डाव ६९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना मुंबई संघाने ७२५ धावांनी आपल्या नावावर केला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवणारे संघ..

७२५ धावा : मुंबई विरुद्ध उत्तराखंड (२०२२

६८५ धावा : न्यू साऊथ वेल्स विरुद्ध (१९२९/३०)

६७५ धावा : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया( १९२०/२१)

६०९ धावा : मुस्लिम कमर्शियल बँक विरुद्ध वॉटर अँड पावर डेवलपमेंट (१९७७/७८)

या विजयासह मुंबई संघाने रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.