कालचे महत्त्वाचे निकालः
काल नेमबाजीमध्ये 'जितू राय' व 'प्रकाश नंजप्पा'ने क्वालिफिकेशनची फेरी पार केली नाही. त्यांना अनुक्रमे १२ व्या व २५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
महिला तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे दीपिका कुमारीने दोन सामने जिंकत ६४ जणांच्या फेरीतून ३२ व ३२ जणांच्या फेरीतून पहिल्या १६ जणांच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे बोम्बायला देवीनेसुद्धा तिच्याकडून असलेल्या अपेक्षांच्यापेक्षा सरस कामगिरी करत पहिल्यांदाच १६ जणांच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
भारोत्तोलन अर्थात वेटलिफ्टिंग पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात भारताच्या सतिश शिवलिंगम याला त्याच्या गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुष ज्युडोच्या ९० किलो वजनी गटात अवतार सिंग याला थेट पाठ टेकवून पहिल्याच फेरीत मात मिळाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला हॉकीमध्येही ऑस्ट्रेलियाने भारतावर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणे आता अधिक कठीण झाले आहे.
पुरुष बॉक्सिंगच्या ८४ किलो वजनी गटात मनोज कुमारने पहिली फेरी जिंकत दुसर्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
आज काय?:
ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून सहाव्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल.
