कालचे महत्त्वाचे निकालः
नेमबाजीमध्ये हिना सिधुला १४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर पुरुष ट्रॅप स्पर्धेच्या क्वालिफिकेशनच्या पहिल्या दिवशी मानवजीत १७व्या तर ज्ञानला १९वे स्थान मिळाले.
जिमनॅस्टीक्समध्ये दिपा कर्माकर हिला अन्-इव्हन बार्स', 'फ्लोअर एक्झरसाईझ', 'बीम', 'वॉल्ट' या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ७७, ७५, ६५ आणि ८ वा क्रमांक आहे. तर ओव्हरऑल ५१वा क्रमांक आहे. तेव्हा ती वॉल्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचली आहे. (भारताचे या खेळातील हे पहिलेच प्रतिनिधित्त्व आहे हे लक्षात घेता यात एका प्रकारात अंतीम फेरीत पोचणेही कौतुकास्पद आहे.)
तिरंदाजीमध्ये कोलंबियाला हरवत भारताने उपांत्यपूर्व फेरीत तर प्रवेश मिळवला मात्र तिथे रशियापुढे अटितटिच्या लढतीत भारताला हार पत्करावी लागली. त्यामुळे महिला 'संघाचे' आव्हान संपुष्टात आले आहे.
हॉकीमध्ये महिला संघाच्या पदरी जपानसोबत २-२ अशी बरोबरी पदरात पडली.
आज काय?:
ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून तिसर्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल.
