जागतीक मैत्री दिनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा 'दोस्ती'

जागतीक मैत्री दिनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा 'दोस्ती'

"दोस्ती " हा १९६४ सालचा बॉक्स ऑफीस हिट आणि आजच्या भाषेत सांगायचे तर सुपर ड्युपर हिट सिनेमा. या सिनेमाचे निर्माते होते ताराचंद बडजात्या. दिग्दर्शन होते सत्येन बोस यांचे. रामू आणि मोहन यांच्या भूमिका करणारे नट होते सुशिलकुमार(सोमाया),सुधिरकुमार (सावंत ). हा सिनेमा संजय खानचा पहिला चित्रपट आणि या चित्रपटातील बाल कलाकार होती फरीदा जलाल. दोस्ती ही रामू (रामनाथ)आणि मोहन दोन मित्रांची गोष्ट. रामनाथ लंगडा आहे आणि मोहन आंधळा आहे. दोघेही गरीब आहेत आणि गावाहून मुंबईत आले आहेत. त्यांच्या मैत्रीवर आधारीत, साधे सरळ कथानक असलेला हा चित्रपट अनेक कारणांनी हिट झाला. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे या सिनेमाची सहाच्यासहा गाणी आजही लोकांच्या हृदयात घर करून बसलेली आहेत.


१९६५ सालच्या फिल्म फेअर अ‍ॅवार्ड मध्ये एकूण सात " नॉमीनेशन आणि सर्वोत्तम दिग्दर्शक हे नॉमीनेशन वगळता सहा फिल्म फेअर अ‍ॅवार्ड या सिनेमाला मिळाले आहेत.

सर्वोत्तम चित्रपट - ताराचण्द बडजात्या
सर्वोत्तम संगीत- दिग्दर्शन लक्ष्मीकांत प्यारेलाल. 
सर्वोत्तम कथा  - बाण भट्ट
सर्वोत्तम पटकथा : गोविंद मूनीस 
सर्वोत्तम पार्श्वगायक मोहम्मद रफी- "चाहूंगा मै तुझे सांज सवेरे" या गीतासाठी  तर 
सर्वोत्तम गीत लेखन-  मजरूह सुलतानपुरी यांना याच गाण्यासाठी.

टॅग्स:

Bobhatabobatamarathi newsmarathi bobhatabobhata news

संबंधित लेख