ऑलिंपिक २०१६ : भारतात रविवार दि.७ ऑगस्टला काय बघाल?

लिस्टिकल
ऑलिंपिक २०१६ : भारतात रविवार दि.७ ऑगस्टला काय बघाल?

ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात रविवारी संध्याकाळपासून दुसर्‍या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल. 

तिरंदाजी:

महिलांच्या तिरंदाजी संघाला कालच्या फेरीत ७वा रँक मिळाला आहे. आता रविवारपासून 'नॉक आउट' सामने सुरू होतील. आज तिरंदाजी महिला संघाचा सामना कोलंबियाशी होईल. हा भा.प्र.वे.नुसार संध्याकाळी ६:४५ला बघता येईल. जर हा सामना जिंकला तर रविवारीच आपल्या  पुढील सामने खेळावे लागतील व दिवस अखेरीस महिलांच्या संघ सामन्यांचे पदक वितरण होईल.

नेमबाजी (शूटिंग):

संध्याकाळी ५:३०: संध्याकाळी महिला १० मी. एअर पिस्टल स्पर्धेला सुरूवात होईल. रविवारी याची क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सर्व फेर्‍या होतील. यात भारतातर्फे हीना सिधू सहभागी होईल. 

संध्याकाळी ६ वाजता पुरुष 'ट्रॅप' स्पर्धेला सुरूवात होईल. रविवारी याची क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सर्व फेर्‍या होतील. यात भारतातर्फे ज्ञान चेनई आणि मानवजीत संधु सहभागी होतील.

जिमॅन्स्टिक्सः

संध्याकाळी ६ वाजल्यापासून जिमनॅस्टीक्सच्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरू होतील. 'अन्-इव्हन बार्स', 'फ्लोअर एक्झरसाईझ', 'बीम', 'वॉल्ट' यातील प्रत्येक प्रकाराच्या तसेच ऑल-राउंड स्पर्धेच्या क्वालिफिकेशन राउंडस होतील.

हॉकी:

संध्याकाळी ७:३० वाजताच महिला हॉकीमध्ये भारत विरुद्ध जपान आमनेसामने असतील.

पदकाच्या अपेक्षा:

काल सानिया मिर्झा-प्रार्थना तसेच पेस-बोपन्ना या दोन्ही टेनिस जोड्या पहिल्याच फेरीत बाहेर पडल्याने भारतीय टेनिसला मोठा धक्का आहे. 

आज ज्या स्पर्धांमध्ये पदके प्रदान होणार आहेत त्यापैकी शूटिंग व महिला सांघिक तिरंदाजीमध्ये भारताचा सहभाग आहे. यांपैकी महिला संघ फॉर्मात आहे व सातवा रँक आहे. आजच्या दिवशी या सातव्या क्रमांकावरून किमान तिसर्‍या क्रमांकावर जाण्याचे प्रयत्न हा संघ करेल. मात्र जरी दीपिका कुमारी व बोम्बायला देवी अनुभवी असले तरी इतर संघाचा फॉर्म लक्षात घेता भारतील संघाच्या पदकाच्या आशा धूसर आहेत.

शुटिंग स्पर्धांमध्ये मात्र हिना सिधु आणि मानवजीत संधू दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. आज खेळणार्‍या तिघांपैकी एखादा खेळाडू पदक पटकावू शकतो अशी आशा आपण करूया.