भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. मोहालीच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला कसोटी मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तर श्रीलंका संघ हा सामना जिंकून मालिका १-१ च्या बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली होती. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय संघ डे नाईट कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच हा भारतीय संघासाठी तिसरा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने कोलकाता आणि अहमदाबादच्या मैदानावर डे नाईट कसोटी सामना खेळला आहे.
अशी असू शकते दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हेन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, मयांक अगरवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, पथुम निसांका, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो
