भारतीय संघात विविध पार्श्वभूमीचे खेळाडू भरती होत असतात. बराच संघर्ष करून राष्ट्रीय संघात त्यांना जागा मिळत असते. असाच एक खेळाडू होता प्रवीण कुमार. घर पैलवानकीची पार्श्वभूमी असलेलं, तर वडील पोलिसांत आणि त्याला क्रिकेटचे वेड लागले होते.
लहानपणीच क्रिकेट खेळत असताना त्याला आपण बॉल चांगला स्विंग करू शकतो हे समजले आणि त्याने स्वताला क्रिकेटसाठी झोकून दिले. रणजी खेळताना त्याने चांगली कामगिरी केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याला 'प्लेयर ऑफ द एयर' देखील करण्यात आले.







