अनपेक्षितपणे मिळविलेला विजय अधिक आनंददायक असतो असे म्हटले जाते. १९८३ साली जिंकलेला वर्ल्डकप असाच जगाला आपण दिलेला अनपेक्षित धक्का होता. तत्कालीन दिग्गज संघांना धूळ चारत कपिल देवाच्या नेतृत्वाखालील संघाने हा वर्ल्डकप भारतात आणला होता.
भारतातील जनतेसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण होता. देशभर खेळाडूंचे जंगी स्वागत झाले होते. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या खेळाडूंचे स्वागत केले होते. संघातील खेळाडूंना या कामगिरीसाठी अनेक सन्मान आणि बक्षिसे मिळाली होती.
आता राष्ट्रीय संघात खेळणारे खेळाडू करोडो रुपये मानधन म्हणून घेत असतात. पण त्याकाळी ही फी किती होती हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. आज याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. त्याकाळी या संघाला किती पैसे मिळत होते, हे खाली दिलेल्या स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता.

