भाऊ चक्क सूर्यामुळे थांबला भारत न्यूझिलंड सामना...

भाऊ चक्क सूर्यामुळे थांबला भारत न्यूझिलंड सामना...

भाऊ, क्रिकेटचा सामना आजवर अनेक कारणासाठी थांबलेला पाहिला आहे. लाईट कमी असणे, पाऊस येणे, पीच खराब असणे किंवा लोकांनी घातलेला गोंधळ अशी कारणं तर कॉमन आहेत. पण आजच्या सामन्यात एक गंमत घडली, भारताने न्यूझिलंडचा डाव लवकर गुंडाळला. डिनर ब्रेक व्हायच्या आधीच भारताची बॅटिंग सुरू झाली. भारताचा डाव थांबवून मग लोक ४५ मिनिटांच्या डिनर ब्रेक वर गेले आणि परत आल्यानंतर दोन ओव्हरमध्येच प्रखर सूर्यप्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला.

स्रोत

सूर्यामुळे सामना थांबविण्याची ही पहिली वेळ नाही. याच ग्राऊंडवर दोन वर्षांपूर्वी झालेला न्यूझिलंड आणि बांगलादेश यांच्यातला टिट्वेंटी सामना थांबवण्यात आला होता.  क्रिकेटमध्ये सामना थांबवण्याचे भन्नाट किस्से आहेत. पीचवर कार येण्याचा किस्सा दिल्लीच्या एका मैदानात घडला होता. पण आंतरराष्ट्रीय सामन्यात आजच्या व्यत्यायाने एक नवीन कारणाची भर पडली आहे.

हा अजब किस्सा घडल्यावर लोक कसे गप्प बसतील. ट्विटरवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्या सारख्या आहेत.

टॅग्स:

cricketmarathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख