सुनील गावस्करची कॉमेंट्री आता कदाचित तुम्ही कधीच ऐकू शकणार नाही!

“या दुनियेमध्ये थांबायाला ना वेळ कोणाला.. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला..” आता येणारा काळच ठरवेल या खेळात नक्की कोण कोण हुकले ते!!

सुनील गावस्करची कॉमेंट्री आता कदाचित तुम्ही कधीच ऐकू शकणार नाही!

भारताचा क्रिकेटचा सामना आणि त्यात सुनील गावस्कर समालोचक म्हणून नाही असे गेल्या दोन दशकात झालेले नाही. भारताच्या अनेक ऐतिहासिक विजयांचा तो साक्षीदार. कदाचित आजवरचा सगळ्यात यशस्वी समालोचक. गेल्या काही वर्षांपासून BCCI ने त्याचाशी करार केलेला होता. पण आता हा करार पुढे चालवण्यास BCCI उत्सुक नाही आणि त्यासाठी दिलेले कारण पण एकदम राजकारण्यांना शोभून दिसणारे आहे.

साधारणत: कॉमेंट्रेटरना एका दिवसाकाठी 35000 ते 100000 रुपये दिले जातात, तर सुनीलला एकदिवसीय मॅचसाठी याच्या आठपट जास्त पैसे मिळतात. गेल्या वर्षी झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अनिल कुंबळेला 39 लाख रुपये मिळाले तर त्याच मालिकेत सुनीलला 90 लाख रुपये देण्यात आले. थोडक्यात, जागतिक क्रिकेटमध्ये दादा असणाऱ्या आणि जगातील सर्वात श्रीमंत बोर्डाला इतके पैसे परवडत नाहीयेत.

आतल्या गोटातील चर्चा ऐकल्यास या मागचे खरे कारण म्हणजे सुनील गावस्करचे BCCI अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी असलेले मतभेद. खरंतर BCCI हा नेहमीच राजकारणाचा आखाडा ठरला आहे. त्यामुळे या बातमीत कोणतेही नवल नाही. पण एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाच्या मुळावर उठलेला पाहून वाईट नक्कीच वाटते.

गावस्कर नसेल तरीही  अर्थातच, क्रिकेट थांबणार नाही. गावस्करने म्हटलेल्या एका गाण्यातल्या बोलांप्रमाणेच,

“या दुनियेमध्ये थांबायाला ना वेळ कोणाला..

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला..”

आता येणारा काळच ठरवेल या खेळात नक्की कोण कोण हुकले ते!!

 

टॅग्स:

Sunil Gavaskar

संबंधित लेख