तर मंडळी बीसीसीआयच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यात एक लेफ्ट आर्म फिरकी बॉलर गिरकी घेऊन बॉल टाकताना दिसतोय. क्रिकेटच्या खेळात बॅट्समनला हवे तसे फटके मारायची संधी आहे. हेलिकॉप्टर शॉट, स्विच हिट, रिवर्स स्वीप असले काय काय फटके मारता येतात.. पण बॉलवर नेहमीच निर्बंध आहेत. त्यांच्या ऍक्शनवर वाद होतात आणि नो बॉल-वाईड बॉलचे निर्बंध तर आहेतच. तसाही क्रिकेट हा बॅट्समन गेम आहे. पण कधीतरी एखादा खेळाडू विचित्र ॲक्शन घेऊन येतो आणि काही नवीन प्रयोग करतो. आजचा हा प्रयोग त्यातलाच एक आहे. पण हा प्रयोग नियमात बसणारा वाटत असला तरी अंपायरने या बॉलला डेड बॉल घोषित केला आहे. म्हणजेच काय तर एक गिरकी जास्त घेतली आणि बॅट्समनला चकविण्याच प्रयत्न केला तर ते अयोग्य ठरते? आता तुम्हीच आम्हाला सांगा याबद्दल तुमचे मत काय आहे? तुम्हाला या बॉलरची ॲक्शन योग्य वाटते का?
व्हिडीओ ऑफ दि डे : बॅट्समनचा स्विच हिट तुम्ही पाहिला असेल, पण आज स्पीच बॉलिंग लगेच बघून घ्या...

टॅग्स:
cricketmarathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment
संबंधित लेख

Sports
या ५ कारणांमुळे आर अश्विन आहे भारतीय संघाच्या वाईस कॅप्टनसीसाठी परफेक्ट चॉईस...
२३ फेब्रुवारी, २०२३

Sports
जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२

Sports
हे आहेत वनडे क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ३ फलंदाज,एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश....
२५ जून, २०२२

Sports
'शरीर साथ देत नाही...' म्हणत भारतीय महिला संघातील 'या' क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले राम राम
२२ फेब्रुवारी, २०२२