आशिया चषक २०२२ स्पर्धेची (Asia Cup 2022) सुरुवात येत्या २७ ऑगस्ट पासून होणार आहे. आपण सर्व ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत,तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र या संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांना संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाहीये. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.
१) रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) :
रवी बिश्नोईला आशिया चषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याला १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे, मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाणार नाही. याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल सारख्या गोलंदाजांना प्राधान्य दिले जाईल. इतकेच नव्हे तर दिग्गज गोलंदाज आर अश्विनचा देखील या यादीत समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत रवी बिश्नोई बेंचवर बसून राहू शकतो.
२) दीपक हुड्डा ( Deepak Hooda) :
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी दोन्ही क्षेत्रात तो जबरदस्त कामगिरी करत आहे. मात्र भारतीय संघात असे देखील काही खेळाडू आहेत जे दीपक हुड्डा पेक्षा अनुभवी आहेत. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा देखील सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. दोघेही खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना देखील संघासाठी मोलाचे योगदान देत असतात. हे दोन खेळाडू संघात असताना दीपक हुड्डाला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
३) आवेश खान ( Avesh khan ) :
आवेश खानला देखील आशिया चषक २०२२ स्पर्धेत संधी मिळणे जरा कठीण आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेत वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि अर्शदिप सिंगला संधी दिली जाऊ शकते. तर हार्दिक पंड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. तसेच रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल आणि आर अश्विन या ३ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे आवेश खानला संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
काय वाटतं? या ३ खेळाडूंपैकी कुठल्या खेळाडूला आशिया चषक २०२२ स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते? कमेंट करून नक्की कळवा.
