आयसीसी टी -२० WC २०२२ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणारे टॉप -३ संघ...

आयसीसी टी -२० WC २०२२ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणारे टॉप -३ संघ...

आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा अतिशय खास असणार आहे. यावेळी जेतेपद मिळवण्यासाठी १६ संघ आमने सामने येणार आहेत. १६ ऑक्टोबर पासून ते १३ नोव्हेंबर दरम्यान क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. गतवर्षी टॉप ८ मध्ये असलेल्या संघांना थेट सुपर १२ मध्ये प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया, स्कॉटलंड, यूएई, झिम्बाब्वे आणि आयर्लंड हे संघ सुपर १२ फेरीत प्रवेश करण्यासाठी आमने सामने येणार आहेत. 

सध्या भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सुपर १२ मध्ये आहेत. मात्र जेतेपदाचा मान केवळ १ संघाला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला असे ३ संघांबद्दल माहिती देणार आहोत, जे आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

ऑस्ट्रेलिया (Austrelia) :

गतविजेता ऑस्ट्रेलिया संघाला आगामी आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. यामागे अनेक कारणे देखील आहेत. सर्वात मुख्य कारण म्हणजे ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना परिस्थितीचा चांगलाच अंदाज असणार आहे. तसेच आणखी एक मुख्य कारण म्हणजे टी -२० संघाचा कर्णधार ॲरोन फिंच उत्तम नेतृत्व करतोय. त्याने वनडे क्रिकेटला राम राम केले आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष आता टी -२० क्रिकेटवर आहे.

पाकिस्तान (Pakistan) :

बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने गेल्या काही वर्षांपासून अप्रतिम कामगिरी केली आहे. गतवर्षी झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला होता. त्यानंतर साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 

पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आशिया चषक २०२२ स्पर्धेत त्याला धावा करता आल्या नव्हत्या. मात्र त्यानंतर त्याने जोरदार कामगिरी केली आहे.

भारतीय संघ (Indian team) :

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत केलेली निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय संघ आता परत ट्रॅकवर आला आहे. सध्या भारतीय संघ आयसीसी टी -२० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तसेच यावेळी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. मात्र यावेळी भारतीय संघ जोरदार कमबॅक करणार यात काहीच शंका नाही. 

भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेत त्याने जोरदार शतकी खेळी केली होती. 

काय वाटतं? यापैकी कुठला संघ आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे जेतेपद पटकावणार? कमेंट करून नक्की कळवा.