कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ फलंदाज ठरले आहेत सर्वाधिक वेळेस नर्व्हस नाईंटीजचे बळी! यादीत २ भारतीय फलंदाज...

कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ फलंदाज ठरले आहेत सर्वाधिक वेळेस नर्व्हस नाईंटीजचे बळी! यादीत २ भारतीय फलंदाज...

क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजासाठी आनंद देणारी गोष्ट म्हणजे फलंदाजी करताना शतक झळकावणे. मात्र सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शतकाच्या अगदी जवळ असताना बाद होऊन माघारी परतणं. ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज ट्रेविस हेड वेस्ट इंडिज विरुध्द सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ९९ धावांवर बाद झाला. केवळ १ धावेमुळे त्याचे शतक हुकले. शतक झळकावण्याच्या वाटेवर असताना, ब्रेथवेटने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने तो नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मात्र हे काही पहिल्यांदा घडले नाही. अनेक असे फलंदाज आहेत, ज्यांना ९० धावा केल्यानंतर शतक पूर्ण करता आले नाहीये. आज आम्ही तुम्हाला ९० धावा केल्यानंतर बाद सर्वाधिक वेळेस बाद होणाऱ्या टॉप -५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

)स्टीव्ह वॉ:

 कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ९० -१०० धावांच्या दरम्यान बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह वॉ पहिल्या स्थानी आहे. स्टीव्ह वॉने १९८५ -२००४ पर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण १६८ कसोटी सामने खेळले. यादरम्यान ५१.०६ च्या सरासरीने १०९२७ धावा केल्या. तसेच ३२ शतके आणि ५० अर्धशतके झळकावणारा स्टीव्ह वॉ एकूण १० वेळेस ९० धावा केल्यानंतर बाद झाला आहे.

२)राहुल द्रविड:

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. १६४ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतके आणि ६३ अर्धशतके झळकावणाऱ्या राहुल द्रविडने एकूण १३२८८ धावा केल्या. यादरम्यान तो १० वेळेस ९० धावा केल्यानंतर बाद होऊन माघारी परतला. २७० धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे.

३) सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. १९८९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरने एकूण २०० कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांच्या साहाय्याने १५९२२ धावा केल्या. २०१३ मध्ये निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर एकूण १० वेळेस ९० धावा केल्यानंतर शतक पूर्ण न करता माघारी परतला.

) मायकल स्लेटर:

ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडू मायकल या यादीत चौथ्या स्थानी आहे. स्लेटरने ७४ कसोटी सामन्यांमध्ये ४२.८३ च्या सरासरीने ५३१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली. तर ९ वेळेस तो ९० धावा केल्यानंतर शतक पूर्ण न करता माघारी परतला.

) एबी डीव्हीलियर्स

कसोटी क्रिकेटमध्ये ९० धावा केल्यानंतर शतक पूर्ण न करता माघारी परतण्याच्या बाबतीत एबी डीव्हीलियर्स पाचव्या स्थानी आहे. तो ८ वेळेस बाद होऊन माघारी परतला आहे. विंडीजचा माजी फलंदाज अल्विन कल्लीचरण, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक हे देखील आपल्या कसोटी कारकिर्दीत आठ वेळा नर्व्हस नाईंटीजचे बळी ठरले आहेत.कल्लीचरणने ६४ तर डीव्हीलियर्सने ११४ आणि इंझमाम-उल-हकने १२० कसोटी सामने खेळले आहेत.

टॅग्स:

sachin tendulkarrahul dravid

संबंधित लेख