आशिया चषक २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तान संघाला चांगलीच धूळ चारली आहे. आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा देखील टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. दरम्यान आज आम्ही तुम्हाला टी -२० आंतरराष्ट्रीय (Most runs in T-20I) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल अधिक माहिती देणार आहोत. चला तर पाहूया टॉप -५ फलंदाजांची यादी.
ॲरोन फिंच (Aaron finch):
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया संघातील या विस्फोटक फलंदाजाने ९२ टी -२० सामन्यांतील ९२ डावांमध्ये ३५.२४ च्या सरासरीने २८५५ धावा केल्या आहेत. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. टी -२० क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात छोटा फॉरमॅट आहे. या फॉरमॅटमध्ये १७२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय
पॉल स्टर्लिंग (Paul sterling) :
आयर्लंड संघातील अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग या यादीत चौथ्या स्थानी आहे. पॉल स्टर्लिंगने ११४ सामन्यांतील ११३ डावांमध्ये २८.६७ च्या सरासरीने ३०११ धावा केल्या आहेत. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १ शतक आणि २० अर्धशतकांची नोंद आहे. तर नाबाद ११५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) :
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत माजी भारतीय कर्णधाराचे देखील नाव आहे. विराट कोहलीने १०० सामन्यांतील ९२ डावांमध्ये एकूण ३३४३ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ४९.८९ च्या सरासरीने केल्या आहेत. विराट कोहलीला आतापर्यंत टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाहीये. मात्र त्याने ३० अर्धशतके झळकावली आहेत. तसेच नाबाद ९४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
मार्टिन गप्टील (Martin guptil) :
न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज मार्टिन गप्टील या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्टिन गप्टीलने १२१ सामन्यांतील ११७ डावांमध्ये ३१.७८ च्या सरासरीने ३४९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २० अर्धशतके झळकावली आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) :
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या स्थानी आहे. रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टील या दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानासाठी स्पर्धा आहे. रोहित शर्माने १३२ सामन्यांतील १२४ डावांमध्ये ३४९९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतके आणि २७ अर्धाशतके झळकावली आहेत.
काय वाटतं रोहित शर्मा आपले पहिले स्थान टिकवून ठेवू शकतो का? कारण मार्टिन गप्टील आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू आहे.
