युवराज, गिब्स नव्हे तर 'या' दिग्गजाने ५४ वर्षांपूर्वी मारले होते सलग ६ चेंडूंमध्ये ६ षटकार...

युवराज, गिब्स नव्हे तर 'या' दिग्गजाने ५४ वर्षांपूर्वी मारले होते सलग ६ चेंडूंमध्ये ६ षटकार...

क्रिकेटच्या इतिहासात ३१ ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या दिवशी असं नेमकं काय घडलं होतं. जेव्हा क्रिकेटमध्ये ६ षटकार मारण्याचा उल्लेख केला जातो त्यावेळी हर्षल गिब्स आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) सारख्या फलंदाजांचे नाव सर्वात पुढे असते. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम हा ५४ वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता. आता पहिल्यांदा सलग ६ षटकार मारणारा फलंदाज कोण? त्याने हे षटकार कधी मारले? याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. (6 sixes in over)

एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम हा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज गॅरी सोबर्सने (Garry sobers) केला होता. या पराक्रमाला आज ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका सामन्यात हा पराक्रम केला होता. असा पराक्रम करणारे ते पहिलेच फलंदाज ठरले होते.

गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिज संघाचे दिग्गज फलंदाज होते. त्यांनी अनेक वर्षे वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व देखील केले होते. त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी १९६५ पासून ते १९७४ पर्यंत वेस्ट इंडिज संघाची जबाबदारी पार पाडली. यादरम्यान त्यांनी अनेकदा वेस्ट इंडिज संघाला अविश्वसनीय विजय देखील मिळवून दिले.

काउंटी क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास..

१४ सप्टेंबर १०६७४ रोजी त्यांनी नॉटिंगहॅमशायर संघासाठी खेळण्याचा करार केला होता. यासह त्यांना संधाचे कर्णधारपद देखील देण्यात आले होते. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी ग्लेमॉर्गन संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मॅक्क्युलम नाशच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूंमध्ये ६ षटकार मारले होते. त्यांनी या षटकात सलग ४ चौकार मारले होते.मात्र पाचव्या चेंडूवर त्याचा झेल उडला आणि झेल क्षेत्ररकाच्या हातात गेला. मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवर पडला त्यामुळे हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पडला.

गॅरी सोबर्स नंतर दिग्गज भारतीय अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांनी १९८४-८५ सलग ६ षटकार मारत गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. यानंतर युवराज सिंगने टी-२० वर्ल्ड कपमध्ये ६ षटकार, वनडेमध्ये हर्शल गिब्स आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायरन पोलार्डने सलग ६ षटकार मा रले होते.