ICC टी-20 WC स्पर्धेच्या इतिहासात या खेळाडूंनी टिपले आहेत सर्वाधिक झेल! यादीत केवळ १ भारतीय...

ICC टी-20 WC स्पर्धेच्या इतिहासात या खेळाडूंनी टिपले आहेत सर्वाधिक झेल! यादीत केवळ १ भारतीय...

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी क्रिकेट चाहते उत्साहित असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण २३ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गतवर्षी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या हाय व्होल्टेज सामन्यात खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असतो. त्यामुळे खेळाडूंकडून चुका होत असतात. कधी कधी खेळाडू सोपे झेल सोडतात. तर कधी रन आऊट करण्याची संधी हुकवतात.(Most catches in Icc T20 World Cup)

 मात्र काही असे देखील खेळाडू आहेत ते दबाव असलेल्या सामन्यात देखील झेल टिपतात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपले आहेत.

) एबी डिविलियर्स (Ab devilliers)

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा एबी डिविलियर्स या यादीत पहिल्या स्थानी आहे. एबी डिविलियर्स उत्तम फलंदाजासह चांगला क्षत्रेरक्षक देखील आहे. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात उभा केलं तरी तो आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडायचा. त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील ३० सामन्यांमध्ये २३ झेल टिपले आहेत.

) मार्टिन गप्टिल (Martin guptill

न्यूझीलंड संघातील फलंदाज मार्टिन गप्टिल जितका आक्रमक आहे तितकाच उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. मार्टिन गप्टिलने आतापर्यंत आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९ झेल टिपले आहेत. 

) डेव्हिड वॉर्नर (David Warner) :

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर क्षेत्ररक्षण करताना देखील चपळ दिसून येतो. डेव्हिड वॉर्नरकडे झेल गेला आणि त्याच्या हातून झेल सुटला हे खूप कमी वेळेस पाहायला मिळतं. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत एकूण ३० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८ झेल टिपले आहेत.

) रोहित शर्मा (Rohit Sharma) :

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. मात्र गोष्ट जेव्हा क्षेत्ररक्षणाची येते, तेव्हा रोहित शर्मा देखील कोणापेक्षा कमी नाहीये. रोहित शर्माने आतापर्यंत टी -२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५ झेल टिपले आहेत.

) ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) :

वेस्ट इंडिज संघाचा माजी खेळाडू ड्वेन ब्रावो हा परफेक्ट ऑल राऊंडर खेळाडू आहे. कारण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना देखील त्याची जादू पाहायला मिळत असते. त्याने आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५ झेल टिपले आहेत. 

काय वाटतं? असा कोणता खेळाडू आहे जो एबी डिविलियर्सचा सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.