भारतीय संघाला पाणी पाजणारा हा गोलंदाज, इंग्लिश फलंदाजांची उडवतोय दांडी!! पाहा व्हिडिओ..

भारतीय संघाला पाणी पाजणारा हा गोलंदाज, इंग्लिश फलंदाजांची उडवतोय दांडी!! पाहा व्हिडिओ..

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh yadav) हा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र अनेकदा तुम्ही उमेश यादवला प्लेइंग ११ नव्हे, तर बेंचवर बसलेलं पाहिलं असेल. भारतीय संघ जेव्हाही ३ गोलंदाजांसह मैदानात उतरतो त्यावेळी उमेश यादवचं नाव नसतं. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात देखील उमेश यादवला संधी मिळाली नव्हती. तसेच वनडे आणि टी -२० संघात देखील त्याचा समावेश करण्यात आला नाहीये. सध्या तो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला आहे.

उमेश यादवने काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत मिडीलसेक्स संघासाठी पदार्पण केले आहे. त्याने सोमवारी (११ जुलै) वुस्टरशर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या स्विंग गोलंदाजीने अनेकांना अडचणीत टाकले. मात्र टेलर कॉरनेल नावाचा फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकून टेलरला बाद केले. उमेश यादवने टाकलेला चेंडू टेलरने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि चेंडूने बॅट आणि पॅडच्या मधून मार्ग काढत ऑफ स्टंप उडवला.

 या स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात मिडीलसेक्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या डावात मिडीलसेक्स संघाचा डाव अवघ्या १८८ धावांवर संपुष्टात आला होता. संघाची धावसंख्या ६८ असताना ६ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर ल्यूक हॉलमेनने ६२ आणि टॉम हेल्मने ५० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १८८ पर्यंत पोहचवली. उमेश यादव फलंदाजीला आला असता त्याला एकही धाव करता आली नाही.

काउंटी चॅम्पियनशिप डिविजन २ च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, मिडीलसेक्स संघाने ९ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर नॉटिंगहॅमशर संघ ५ विजय मिळवून पहिल्या स्थानी आहे. तसेच वुस्टरशर संघ २ सामन्यांमध्ये विजय मिळवून पाचव्या स्थानी आहे.