लाल मुंग्यांची चटणी. नाव वाचूनच कळालं असेल की आज काहीतरी सुरस आणि रंजक माहिती वाचायला मिळणार. ओडीसा राज्यात आदिवासी लोकांत खाल्ल्या जाणाऱ्या या चटणीला नुकताच जी आय नामांकन मिळालं आहे. त्याविषयीच थोड जाणून घेऊयात.
ओडीसा राज्यातील मयूरभंजमध्ये काही आदिवासी लोक लाल मुंग्यांची चटणी अगदी चवीने खातात. ही चटणी रुचकर तर असतेच, पण आरोग्यासाठी देखील अतिशय गुणकारी मानली जाते. ही चटणी विवर मुंग्यांपासून बनवली जाते. या मुंग्या झाडाच्या पान एकमेकांत विणून त्याचं घर बनवतात म्हणून त्यांना विवर मुंग्या म्हटलं जात. त्यांना मॉस मुंग्या देखील म्हणतात. त्यांनी झाडाच्या पानापासून बनवलेल्या अंडाकृती आकाराच्या घरावर जोराचा वारा पाऊस यांचा काहीच परिणाम होत नाही.


