पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळावं ही फार जुनी मागणी आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने नुकतंच प्रमुख क्रिकेटर्ससोबत एक करार केला आहे. या यादीतील विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या टॉपच्या पुरुष खेळाडूंना वर्षाकाठी ७ कोटी रुपये मिळणार आहेत, तर महिला क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंना ५० लाख इतकंच मानधन मिळणार आहे.
याबद्दल आपले विचार मांडताना क्रिकेटर स्म्रिती मन्धाना हिने सांगितलं, की ‘महिला खेळाडूंना मिळणारं कमी वेतन चुकीचं आहे असं मला वाटत नाही.’ तिच्या या मतावर बरीच चर्चा झाली. आज जाणून घेऊया तिच्या या वक्तव्यामागचं कारण काय होतं ते.







