व्हिडिओ: विजेंदरचा पुन्हा एकदा नॉक आउट पंच!!

व्हिडिओ: विजेंदरचा पुन्हा एकदा नॉक आउट पंच!!

भारताचा बॉक्सिंग सुपरस्टार विजेंदर सिंगने प्रोफेशनल बॉक्सिंगमधे सलग सहावा विजय मिळवला आहे. त्याने सुपर मिडलवेट डिव्हिजनमध्ये पोलंडच्या आंद्रेज सोल्डरा याच्यावर नॉक आऊट पद्धतीने विजय मिळवला. पहिल्यांदाच आठ राऊंडची बाउट खेळणाऱ्या विजेंदरने सोल्डरावर पहिल्या पासूनच जोरदार हल्ला चढवला. तिसऱ्या राउंडमध्ये रेफरीने सामना थांबवून विजेंदरला विजयी घोषित केले.

ऑलम्पिक मेडलिस्ट विजेंदरचा पुढचा सामना आता वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशनच्या आशिया चॅम्पियनशिपसाठी दिल्ली येथे होणार आहे. हा सामना आधी ११ जूनला होणार होता पण आता हा जुलैमध्ये पुढे ढकलण्यात आला आहे.