’डोंबिवली फास्ट’ या आपल्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले दिग्दर्शक निशिकांत कामत घेऊन आलेत ’मदारी’ हा पुढचा चित्रपट. या चित्रपटात इरफान खान एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका अपघातात त्याचा मुलगा मृत्यू पावतो, इरफान त्यासाठी गृहमंत्र्यांना जवाबदार धरतो आणि पुढे त्यांच्याच मुलाचे अपहरण करतो.
निशिकांत कामतने या आधी ’मुंबई मेरी जान’सारख्या चित्रपटातून सत्यघटनेवर आधारित मानवी मनाची गुंतागुंत आपल्या समोर आणली आहे. मराठीत ’डोंबिवली फास्ट’, ’लै भारी’ असे चित्रपट देणाऱ्या निशिकांतने हिंदीमध्ये ’दृष्यम’, ’फोर्स ’असे चित्रपट दिले आहेत.




