विराटने ८२ धावांची खेळी करत मोडले अनेक रेकॉर्डस्!! पाहा रेकॉर्डस्ची संपूर्ण यादी...

विराटने ८२ धावांची खेळी करत मोडले अनेक रेकॉर्डस्!! पाहा रेकॉर्डस्ची संपूर्ण यादी...

रविवारी पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी करत भारताला जोरदार विजय मिळवून दिला. असे रोमांचक सामने खूप कमी पाहायला मिळतात. कारण ज्यावेळी विराट कोहली फलंदाजीला आला, त्यावेळी सामना हा पाकिस्तान संघाच्या हातात होता. मात्र त्यानंतर विराटने ८२ धावांची धाडसी खेळी केली आणि भारतीय संघाला सामना जिंकून दिला. या तुफानी खेळी सह विराटने अनेक मोठ मोठे विक्रम मोडून काढले आहेत. चला तर पाहूया.

ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० धावा पूर्ण...

ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० धावा पूर्ण करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला ५०० धावांचा पल्ला गाठता आला नाहीये. हा पराक्रम त्याने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात केला आहे.

टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम खेळी..

विराट कोहली आता टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ८२ धावांची खेळी करत ही कारनामा केला आहे. यापूर्वी देखील त्याने ऑस्ट्रेलिया विरुध्द ८२ धावांची खेळी केली आहे.

टी -२० विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी...

८२* धावा विरुध्द पाकिस्तान

८२* धावा विरुध्द ऑस्ट्रेलिया

७८* धावा विरुध्द पाकिस्तान

७२* धावा विरुध्द दक्षिण आफ्रिका

५७* धावा विरुध्द बांगलादेश

टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून पहिले अर्धशतक झळकावणारे फलंदाज..

२००७ - रॉबिन उथप्पा

२००९ - गौतम गंभीर

२०१०- सुरेश रैना

२०१२- विराट कोहली

२०१४- विराट कोहली

२०१६- विराट कोहली

२०२१ - विराट कोहली

२०२२- विराट कोहली*

संघातील सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला होता. त्याने कुठलाही दबाव न घेता, हार्दिक पंड्या सोबत मिळून डाव सावरला आणि भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला. उर्वरित सामन्यांमध्ये देखील विराट कोहलीकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.