वर्ल्डकप आता ऐन बहरात आलेला आहे. सेमी फ़ायनलच्या टिम्स जवळपास निश्चित झाल्या आहेत. भारताचे पण सेमी फाइनलचे टिकिट फायनल झाले आहे. मंडळी कालची मॅच हरलो असतो तर मात्र भारताचे टिकिट धोक्यात आले असते राव!! अश्यावेळी आपल्या टीमला चीयर करण्यासाठी देश विदेशातून फॅन आले होते. यात काही वयस्कर फॅन पण होते. अशाच वयस्कर मंडळींमध्ये एक नव्वदितल्या आजीबाई पण होत्या.
मॅच सूरु असताना सगळीकडे या आजीबाईंचाच जलवा होता. जोरजोरात भोंगे वाजवत आणि झेंडा फडकवत आपल्या टीमला आजीबाई चीयरअप करत होत्या. आता तर भारताच्या विजयापेक्षा आजीबाईंच्याच जास्त चर्चा होत आहेत राव!!








