बॉक्सिंग हा तसा सर्वाधिक चित्तथरारक खेळांपैकी एक समजला जातो. यात असणारी मुक्केबाजी, सेकंदागणिक होणारी चढाओढ ही बॉक्सिंग पाहण्याचा आनंद द्विगुणित करणारी असते.
मात्र बॉक्सिंगमध्ये दोन कांस्यपदके दिली जातात हे तुम्हाला माहिती आहे का?
याच कारणांनी मेरी कोम आणि विजेन्द्र सिंग यांनी अनुक्रमे २०१२ आणि २००८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सुवर्णपदक आणि रौप्यपदक जसे एकाच विजेत्या खेळाडूला दिले जाते, तसे कांस्यपदकचे नाही.
बॉक्सिंगमध्ये पहिल्या दोन विजेत्यांना सुवर्ण आणि रौप्यपदक मिळते, तर सेमी फायनल हरलेल्यांमध्ये कांस्यपदकासाठी प्लेऑफ सामना होत असतो. थोडं मागे गेले तर हे प्रकरण समजायला तुम्हाला मदत होईल.

