क्रिकेटमध्ये सध्या भारत चांगले दिवस पाहत आहे. अनेक रेकॉर्डस् भारतीय खेळाडू स्वतःच्या नावावर करत आहेत, पण आता एक वेगळा रेकॉर्ड भारताच्या नावावर होणार आहे. अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात येत आहे.
भारतात या ठिकाणी तयार होत आहे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम !!


सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. तिथे जवळपास एक लाख लोक एकाच वेळी मॅच पाहू शकतात. भारतात बनणाऱ्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव दिले जाणार आहे. पुढच्या वर्षी हे स्टेडियम बनून तयार होईल. आणि लगेचच त्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. मेलबर्न स्टेडियमपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता या ग्राऊंडची असणार आहे.

मेलबर्न स्टेडियम ज्या कंपनीने तयार केले आहे त्याच पॉप्युलस कंपनीला हे स्टेडियम बनविण्याचे काम दिले आहे. तब्बल 63 एकर जागेवर हे स्टेडियम तयार होत आहे. या स्टेडियमवर 76 कॉर्पोरेट बॉक्स, 4 ड्रेसिंग रूम, 3 नेट प्रैक्टिस ग्राउंड या साऱ्या सुविधा असणार आहेत.
मंडळी भविष्यात जऱ ऑलिम्पिक भारतात झाले तर या स्टेडियमचा उपयोग करता यावा हा विचार करूनच हे स्टेडियम तयार करण्यात आले आहे.

या स्टेडियमला बनविण्यात 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. या स्टेडियमवर पहिल्यांदा टी 20 मॅच खेळली जाणार आहे.
टॅग्स:
संबंधित लेख

या ५ कारणांमुळे आर अश्विन आहे भारतीय संघाच्या वाईस कॅप्टनसीसाठी परफेक्ट चॉईस...
२३ फेब्रुवारी, २०२३

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२

हे आहेत वनडे क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ३ फलंदाज,एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश....
२५ जून, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२