या १० कारणांमुळे भारतीय आहेत जगातील सर्वात जास्त संयमी माणसे.

लिस्टिकल
या १० कारणांमुळे भारतीय आहेत जगातील सर्वात जास्त संयमी माणसे.

ट्राफिकच्या भल्या मोठ्या रांगेपासून, पावसाची वाट बघणे असो वा घरात लाईट गेल्यावर दुसऱ्याच्या घरात डोकावून ‘अगं सगळ्यांची गेली आहे’ असं म्हणून लाईट परत यायची अंधारात वाट बघणारी माणसे फक्त भारतातच मिळू शकतात. हाऊसफुल ३ सारखे सिनेमे थिएटर मध्ये जाऊन ३ तास ‘याची देही याची डोळा’ पाहणाऱ्या माणसांना संयमीपणाचा स्पेशल नोबेल देण्यात यावा असेही ऐकण्यात आले होते. भारतीयांच्या याच संयमी, धैर्यशील वृत्तीला सलाम करत आम्ही घेऊन आलो आहोत भारतीयांच्या संयमीपणाची १० कारणे....

१.	दोन मिनिटाच्या मॅगीसाठी आपण १० मिनिट थांबतो.

१. दोन मिनिटाच्या मॅगीसाठी आपण १० मिनिट थांबतो.

दो मिनट में रेडी. नाही बुवा, खोटं आहे हे. त्या मुलींना विचारा ज्यांना फक्त मॅगीचं बनवता येते...

२.	loading... loading...स्लो इंटरनेट

२. loading... loading...स्लो इंटरनेट

ऐन चाटिंगच्यावेळी स्लो झालेलं इंटरनेट म्हणजे भूकंपच! पण घाबरायचं नाही. थांबा, बघा आणि लोड होऊद्या.  किंवा मोबाईल एकदा बंद करून पुन्हा चालू करा हा भारतीय मंत्र आम्हा सगळ्यांना माहित आहे.

३.	ट्रॅफिक

३. ट्रॅफिक

वर मी म्हणणारं ऊन आणि त्यात भलीमोठी ट्रॅफिकची रांग. हॉर्न वाजवून कितीही हात दुखले तरी आपण भारतीय निमूटपणे ट्रॅफिक क्लियर होण्याची वाट बघतो.

४. ’अच्छे दिन’ ची वाट बघणे !

४. ’अच्छे दिन’ ची वाट बघणे !

हम्म.. हे अच्छे दिन कधी येतील देव जाणे, पण भारतीय माणसाचा संयम कधीही कमी होणार नाही. (‘मेरे अच्छे दिन आयेंगे....  जरूर आयेंगे....’)

५.	पाउस

५. पाउस

जून महिना अर्धा संपला पण अजूनही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. पाऊस येणार यावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकर्‍यापेक्षा मोठा संयमी कोण असणार बुवा ?

६.	सुट्टे पैसे

६. सुट्टे पैसे

‘छुट्टा नही है’ म्हणत दुकानदाराकडून, रिक्षावाल्याकडून सुट्टे पैसे मिळेपर्यंत थांबणे हे आपल्या रक्तात आहे.

७.	चुभती, जलती गर्मी...

७. चुभती, जलती गर्मी...

गर्मी असली तरी काम आधी. पाऊस येणार या आशेवर कितीही उकाडा असू दे, आम्ही सहन करतोच.

८.	online मागवलेल्या वस्तूंची चातकाप्रमाणे वाट बघणे

८. online मागवलेल्या वस्तूंची चातकाप्रमाणे वाट बघणे

इंतजार और थोडा इंतजार...

९.	चांगले सरकार !

९. चांगले सरकार !

बघू पुढच्या इलेक्शनला !

१०.	बाहुबली २ कधी येणार ???

१०. बाहुबली २ कधी येणार ???

खर तर हा जागतिक प्रश्न आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाच्या उत्तरासाठी कित्येक भारतीय गुगल करून थकलेत पण बाहुबलीची वाट बघण सोडलं नाही. जय महिष्मती!!