एखादी गोष्ट केल्यानंतर अपेक्षित यश मिळाले नाही की अरेरे आपण हे करायलाच नको होतं, अशी हळहळ बऱ्याचदा व्यक्त केली जाते. याला कुणीही व्यक्ती अपवाद असू शकत नाही. चित्रपट हिट झाला त्यातील व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारता आल्याबद्दल कौतुक झाले की कोणाही कलाकाराला आपल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल, पण काही चित्रपटांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने असे घडत नाही. काही कलाकार असेही आहेत ज्यांनी काही चित्रपटात विशिष्ट प्रकारची भूमिका साकारल्याबद्दल त्यांना पश्चातापही व्यक्त केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्यक्तिरेखेबद्दल किंवा कथानकाबद्दल पश्चाताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये अक्षयकुमारपासून कॅटरिना कैफपर्यंत अनेकजण आहेत.
चला तर मग बघूया बॉलीवूडमधल्या कोणत्या कलाकारांना कुठला चित्रपट केल्याबद्दल पश्चाताप होतो आहे.











