आज 'उगवला चंद्र पुनवेचा' हे नाट्यपद ऐकलंच पाहिजे- शास्त्र असतं ते !!

लिस्टिकल
आज 'उगवला चंद्र पुनवेचा' हे नाट्यपद ऐकलंच पाहिजे- शास्त्र असतं ते !!

आज कोजागिरी  पौर्णिमा म्हणजे आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा किंवा "शरद पौर्णिमा" !  सध्याच्या जमान्यात कोजागिरीच्या रात्री मसाला दूध वगैरे पिऊन चांदण्यात गप्पा मारणे  लोकांना 'ओव्हरेटेड' वाटायला लागले आहे. त्याशिवाय को म्हटलं की कोव्हीडशिवाय दुसरा शब्दही पटकन आठवत नाही.आजच्या दिवशी बकुल पंडीत यांनी गायलेलं 'उगवला चंद्र पुनवेचा हे गाणं ऐकणं हे  शास्त्र  आहे ! 

१९४६/४७ साली आचार्य अत्र्यांच्या 'पाणिग्रहण' नाटकातील हे पद (संगीत नाटकातल्या गाण्याला 'पद' म्हणणे  हे पण एक शास्त्र आहे)
त्या काळात गाजलं नाही. १९७१ च्या दरम्यान श्रीनिवास खळे यांनी या पदाला चाल दिल्यावर आजतगायत हे गाणं कोणीच विसरलेले नाही.बकुल पंडीत या गायीकेने हे गाण अमरत्वाला पोहचवलं आहे. सत्तरीच्या दशकानंतर पुन्हा एकदा नाट्यसंगीताची लाट निर्माण होण्यासाठी- आजच्या भाषेत व्हायरल होण्यासाठी- बकुल पंडीत यांचे योगदान फार महत्वाचे आहे.

चला तर ऐकू या!

उगवला चंद्र पुनवेचा !

मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या

वनिवनी कुमुदिनी फुलल्या

नववधु अधिर मनी जाहल्या !

प्रणयरस हा चहुंकडे !

वितळला स्वर्गिचा ?