अरे, या ६ बॅट्समननी उत्तम बॉलिंग करुन इतक्या विकेट्स घेतल्या आहेत? पटत नाही, वाचाच मग..

लिस्टिकल
अरे, या ६ बॅट्समननी उत्तम बॉलिंग करुन इतक्या विकेट्स घेतल्या आहेत? पटत नाही, वाचाच मग..

क्रिकेटमध्ये बॉलर आणि बॅट्समन हे सर्वात जास्त महत्वाचे असतात हे सर्वांना माहित असलेले सत्य आहे. पण ऑल राउंडर खेळाडूंचे वेगळेच महत्व असते. पण बऱ्याचवेळा असेही पाहायला मिळते की बॉलर असलेला खेळाडू ऐनवेळी चांगली बॅटिंग करून किंवा बॅट्समन ऐनवेळी चांगली बॉलिंग करून संघाला विजय मिळवून देतात. पण हा अपवाद म्हणता-म्हणता काही बॅट्समन असलेल्या खेळाडूंनी नियमित बॉलर्सपेक्षा अधिक विकेट घेतल्याचे काही उदाहरणं आहेत. असं म्हटल्यावर कोणती नावं पटकन तुमच्या डोळ्यांसमोर येतात? पाहा बरं आमची यादी आणि तुमची यादी कितपत मिळतीजुळती आहे??

१) सचिन तेंडुलकर

१) सचिन तेंडुलकर

धावांच्या बाबतीत झाडून सर्व विक्रम आपल्या नावे केलेल्या सचिनने मात्र सुंदर बॉलिंगही करून चांगल्या विकेट घेतल्या आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये २०१ बळी त्याने घेतले आहेत. स्पिन बॉलिंग करणारा सचिन ऑफ स्पिन आणि लेग स्पिन चांगला टाकत असे. त्याने ऐनवेळी विकेट घेऊन संघाला भक्कम केल्याचीही उदाहरणे आहेत.

२) शोएब मलिक

२) शोएब मलिक

शोएब मालिक हा सुरुवातीला पाकिस्तानचा ऑल राउंडर म्हणून फोकसमध्ये आला होता. पण त्याने पूर्ण लक्ष बॅटिंगवर केंद्रित केले. पण तरीही त्याला संघ अडचणीत असेल तेव्हा किंवा रणनीतीचा भाग म्हणून बॉलिंगसाठी धाडले जात असे. पार्ट टाईम बॉलर म्हणून चांगली कामगिरी करत त्याने स्वतःच्या नावे २१८ विकेट केल्या आहेत.

३) सौरव गांगुली

३) सौरव गांगुली

भारतीय संघात दादा म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली बॅटिंगच्या बाबतीत जबरा होता, हे सर्वांना माहित आहे. तो अधून मधून बॉलिंगही करत असे. त्याकाळी भारत तीन स्पिनर आणि एक फास्ट बॉलरसह मैदानात उतरत असे. अशावेळी गांगुली बॉलिंग करून दुसऱ्या फास्ट बॉलरची कमी भरून काढत असे. अधून मधूनच तो बॉलिंग करत असला तरी असे करत त्याने १०० विकेट घेतल्या आहेत.

४) मोहम्मद हाफिज

४) मोहम्मद हाफिज

मोहम्मद हाफिज हा दीड दशके पाकिस्तानसाठी टॉप ऑर्डरचा बॅट्समन म्हणून प्रसिद्ध होता. पण उलट असे असूनही त्याला बॅटिंगमध्ये अनेकवेळा चमक दाखवता येत नसे. पण जेव्हाही त्याच्या हातात बॉल पडत असे तेव्हा त्याची कामगिरी लक्षणीय ठरली होती. एकूण २४६ विकेट त्याच्या नावावर आहेत.

५) अँड्रू सायमंड्स

५) अँड्रू सायमंड्स

अँड्रू सायमंड्स हा खेळाडू भारतीयांना माहीत आहे तो त्याच्या मुसळधार बॅटिंग आणि हरभजनसोबत त्याच्या झालेल्या वादामुळे. तडाखेबंद बॅटिंगने बॉलर्सना धडकी भरवणारा हा खेळाडू स्वतः देखील चांगला बॉलर होता. त्याने संघाला गरज असेल तेव्हा बॉलिंग करून विकेटही पटकवल्या आहेत. त्याच्या नावे १६५ इंटरनॅशनल विकेटस् आहेत.

६) सनथ जयसूर्या

६) सनथ जयसूर्या

श्रीलंकेचा हा महान खेळाडू तसा भारतीयांचाही लाडका समजला जातो. कारण त्याचा मैदानावरील वावर हा शांत असे. त्याची खरी आक्रमकता बॅटिंगमधून दिसत असे. पण बॉलर म्हणूनही जयसूर्या काही कमी नव्हता. फिरकीचा दिग्गज शेन वॉर्नपेक्षा त्याने वनडेमध्ये अधिक विकेटस् घेतल्या आहेत. शेन वॉर्नच्या नावे वनडेत २९३ विकेट आहेत, तर जयसूर्याच्या नावे मात्र ३२३ विकेट आहेत.

बॅट्समन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलर्सनी बॅटिंग सुरू केली तर बॅटिंग करणारा खेळाडू त्यांना कमी समजून मोठे शॉट मारायला बघतो आणि तिथेच त्यांची विकेट पडते. म्हणून रणनीती म्हणून अशा खेळाडूंकडे बॉलिंग देणे अनेकवेळा फायद्याचे ठरते.

उदय पाटील

टॅग्स:

sachin tendulkar

संबंधित लेख