या पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना लाईफ पार्टनर म्हणून निवडलं !!

लिस्टिकल
या पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना लाईफ पार्टनर म्हणून निवडलं !!

सध्या सगळीकडे विराट आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. हे लग्न अनेकांसाठी सरप्राईज होतं. अनेक अफवा आणि बातम्यांनंतर काल अधिकृतरीत्या दोघांचं लग्न जाहीर झालं. मंडळी, आपल्या करियरच्या सर्वोच्च स्थानावर असताना एखाद्या चित्रपट अभिनेत्रीने क्रिकेटरशी लग्न करणं हे काही नवीन नाही. अशा आणखी काही जोड्या पाहायला मिळतात. चला तर मंडळी,  आज विरूष्काच्या  लग्नाच्या निमित्ताने पाहूयात  थेट क्रिकेटर्सच्या गळ्यात वरमाला घालणाऱ्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत !!

१. झहीर खान आणि सागरिका घाटगे

१. झहीर खान आणि सागरिका घाटगे

झहीर आणि सागरिका या जोडीने नुकतंच लग्न केलं. सागरिका अभिनेत्री आहे.  तिने ‘चक दे इंडिया’ आणि आणखी काही हिंदी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ सारख्या मराठमोळ्या सिनेमातसुद्धा काम केलं आहे.

२. युवराज सिंह आणि हेझल कीच

२. युवराज सिंह आणि हेझल कीच

युवी आणि हेजलने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न केलं. हेजल मूळची ब्रिटीश आहे. तिला सलमानच्या बॉडीगार्डमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल. शिवाय ती मॉडेलिंगसुद्धा करते.

३. हरभजन सिंह आणि गीता बसरा

३. हरभजन सिंह आणि गीता बसरा

२०१५ मध्ये भज्जी आणि गीताचं लग्न झालं. आता तर दोघांना एक गोंडस मुलगी देखील आहे. गीताने लग्न होण्यापूर्वी हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

४. मोहम्मद अझरूद्दीन आणि संगीता बिजलानी

४. मोहम्मद अझरूद्दीन आणि संगीता बिजलानी

मोहम्मद अझरूद्दीनचं लग्न झालेलं असतानाही त्याचं संगीता बिजलानीशी अफेअर असल्याचं म्हटलं जात होतं. शेवटी हे खरं निघालं आणि दोघांनी १९९६ साली लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही !!

५. मन्सूर अली पतौडी आणि शर्मिला टागोर

५. मन्सूर अली पतौडी आणि शर्मिला टागोर

एका अभिनेत्रीने क्रिकेटरशी लग्न केलेलं बहुतेक हे पहिलंच उदाहरण असावं. १९६९ साली दोघांनी लग्न केलं. तोपर्यंत शर्मिला टागोर यांचे ‘काश्मीर की कली’, ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरीस’ सारखे सुपरहिट सिनेमे येऊन गेले होते आणि त्यांचं करियर चढत्या क्रमात होतं. यातच दोघांची भेट झाली. लग्नानंतर सहसा अभिनेत्रीचं करियर संपतं अशी समजूत असते पण इथे उलट झालं. यानंतर ‘राजेश खन्ना’ आणि शर्मिला टागोर’ यांची जोडी हिट ठरली आणि त्यांनी एकसे बढकर एक सुपरहिट सिनेमे दिले.

अभिनेत्रींना क्रिकेटर्स जास्त का आवडतात हा मोठाच अभ्यासाचा विषय आहे....नाही का ?

 

आणखी वाचा :

अभिनंदन विरुष्का...पाहा इटलीत झालेल्या विवाहसोहळ्याचे फोटो !!

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

टॅग्स:

cricket

संबंधित लेख