आमिरच्या दंगलचे नवीन पोस्टर पाहिले का ?

आमिरच्या दंगलचे नवीन पोस्टर पाहिले का ?

हरियाणाच्या मातीतल्या महावीर सिंग फोगट या कुस्तीपटूच्या जीवनावर आधारीत ‘दंगल’ हा आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा २३ डिसेंबरला बॉक्स ऑफिसच्या आखाड्यात दाखल होतोय. प्रदर्शनाआधीच आमिरच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून दंगल झाल्याने हा सिनेमा चर्चेत आला होता. या सिनेमाचा नवीन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात वयस्कर महावीरच्या रूपातला आमीर आपल्या चार मुलींबरोबर दिसून येतोय.

महावीर सिंगच्या रोलसाठी सुरुवातीला आमिरने ९४ किलो वजन वाढवलं होत तर तरुण महावीरच्या रुपात येण्यासाठी तीन महिन्यात वजन कमी देखील केलं आहे. महावीर सिंगच्या पत्नीच्या रुपात साक्षी तन्वर दिसून येईल त्याशिवाय अनेक नवीन चेहरे पाहायला मिळतील.

महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीचे धडे देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यांची मुलगी गीता फोगट ऑलिंपिक मध्ये निवड झालेली पहिली महिला कुस्तीपटू आहे. महावीर सिंगचा आपल्या मुलींच्या भविष्याबद्दल असलेला दृष्टीकोन दाखवणारे एक वाक्य पोस्टर वर लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे “म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के?”

टॅग्स:

movie

संबंधित लेख