तब्बल ३० दिवस लांबीचा सिनेमा रिलीजनंतर नष्ट का करण्यात येईल ?

लिस्टिकल
तब्बल ३० दिवस लांबीचा सिनेमा रिलीजनंतर नष्ट का करण्यात येईल ?

आज आम्ही जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सिनेमाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. या सिनेमाचं नाव आहे ‘अॅम्बियंस’. ३१ डिसेंबर २०२० रोजी हा सिनेमा रिलीज होईल. तब्बल ७२० तास म्हणजे जवळजवळ ३० दिवस इतका लांब हा सिनेमा असणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचा एकच शो लावण्यात येईल आणि त्यानंतर सिनेमा नष्ट करण्यात येईल.

हे वाचून तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. चला तर एकेक करून उत्तरं जाणून घेऊया.

अॅम्बियंस हा ‘प्रायोगिक सिनेमा’ या सिनेप्रकारात मोडतो. स्वीडिश दिग्दर्शक ‘अँँडर्स वेबर्ग’ यांचा हा शेवटचा सिनेमा असणार आहे. या सिनेमानंतर ते निवृत्ती घेतील. जुन्या आणि गाजलेल्या सिनेमांचे रिमेक्स बनवण्याच्या ट्रेंड विरोधात निषेध म्हणून अँँडर्स वेबर्ग यांनी हा सिनेमा बनवायला घेतला आहे.

 

(अँँडर्स वेबर्ग)

अॅम्बियंसचं चित्रीकरण मागच्या ४ ते ५ वर्षापासून सुरु आहे. आतापर्यंत या सिनेमाचे २ ट्रेलर आलेत. ३० दिवसांच्या लांबीच्या चित्रपटाचे ट्रेलर पण तेवढेच मोठे आहेत. पहिल्या ट्रेलरची लांबी ही ७२ मिनिट एवढी मोठी आहे, तर दुसऱ्या ट्रेलरची लांबी तब्बल ७ तास २० मिनिट इतकी मोठी आहे. या संपूर्ण ट्रेलरमध्ये एकही कट नसून तो सलग चित्रित केलेला आहे.

हा पाहा अॅम्बियंसचा दुसरा ट्रेलर.

यापूर्वी लांबीला मोठा असलेला सिनेमा बनवण्याचा प्रयोग स्वीडनच्या ‘एरिका मॅग्नसन’ आणि ‘डॅनियल अँडरसन’ यांनी केला होता. त्यांची लॉजिस्टिक्स नावाची फिल्म तब्बल ८५७ तास म्हणजे ३५ दिवस १७ तास एवढी मोठी होती. जगातल्या सर्वात मोठ्या फिल्मचा मान अजूनही या सिनेमाकडे आहे.

अॅम्बियंस नष्ट का करणार आहेत ?

अॅम्बियंस नष्ट का करणार आहेत ?

महत्त्वाचा प्रश्न असा की अॅम्बियंस नष्ट का करण्यात येईल ? दिग्दर्शक अँँडर्स वेबर्ग यांना अॅम्बियंसला “अस्तित्त्वात नसलेला सर्वात प्रदीर्घ चित्रपट” अशी ओळख मिळवून द्यायची आहे. या कारणाने फिल्मची एकमेव कॉपी प्रदर्शनानंतर नष्ट करण्यात येईल.

या गोष्टीला वेडेपण म्हणा किंवा आणखी काही, पण एवढ्या मोठ्या लांबीची फिल्म तयार करणे आणि त्यावर सलग एवढी वर्ष कष्ट घेणे याला तोड नाही.

टॅग्स:

moviebobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख