अमर फोटो स्टुडिओ हा हॅशटॅग वापरून मराठी तारे तारका आपले जुने पासपोर्ट साईझ फोटो शेअर करत आहेत. जुन्या आठवणी नेहमीच आनंद देतात. पाहा बरं यातले कोणकोणते कलाकार तुम्हाला ओळखू येतात ते?
#amarphotostudio या हॅशटॅगचं गुपित बाहेर पडलं आहे. अनेक दिवस हे हॅशटॅग सोशल साईट्स वर वायरल होत होते. निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, सखी गोखले त्यांच्या ’कलाकारखाना’ हे बॅनर आणि सुनील बर्वेंच्या ’सुबक’ या नाट्यनिर्मितीच्या मार्गदर्शनाखाली 'अमर फोटो स्टुडिओ' या नावाचं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.




























