मंडळी, यावर्षी तेजस नेरुरकर या फोटोग्राफरने २०१९ सालची एक अप्रतिम भेट आणली आहे. त्याने मराठीतल्या २६ वेगवेगळ्या सिनेकलाकारांना घेऊन एक कॅलेंडर तयार केलंय. या कॅलेंडरचं नाव आहे ‘वंदे मातरम २०१९'. नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असणार की कॅलेंडरमध्ये काय पाहायला मिळेल. हे कॅलेंडर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सेनानींना अर्पण करण्यात आलंय.
२६ सिनेकलाकार आणि २६ स्वातंत्र्य सेनानी अशी ही कल्पना आहे. या कॅलेंडरचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला काही अज्ञात स्वातंत्र्यसैनिक भेटतात. उदाहरणार्थ प्रितीलता वड्डेदार, सुब्रमण्य भारती, बेगम हजरत महाल आणि असे बरेचजण. कलाकारांची निवडही कौतुकास्पद आहे. काही कलाकार तर आपल्याला ओळखूही येणार नाहीत इतके त्या भूमिकेत फिट बसले आहेत.
चला तर मंडळी आता पाहूयात हे १२ स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांना साकारणारे आजचे आघाडीचे कलाकार. यातले काही कलाकार तर तुम्हाला ओळखतही येणार नाहीत!!





