काही दिवसांपूर्वीच आम्ही पडद्यामागे काम केलेल्या प्रसिद्ध सेलिब्रिटीजची माहिती दिली होती. आज आम्ही त्या सेलेब्रिटीज बद्दल सांगणार आहोत ज्यांनी पडदा गाजवण्यापूर्वी पडद्यावर अगदी क्षुल्लक भूमिका केल्या. तुम्हाला करण जोहरचा दिलवाले मधला रोल आठवतोय का? नवाजचा मुन्नाभाई एमबीबीएस आणि सरफरोशमधला रोल ? हे तर खूपच ओळखीचे रोल्स झाले राव. लगे राहो मुन्नभाई मध्ये अनुष्का शर्मा होती हे माहित आहे का? ब्लॅक फ्रायडे मध्ये तर दिग्दर्शक इम्तियाज अलीने महत्वाची भूमिका केली होती. हे तर काहीच नाही.. पहला नशा चित्रपटात तर शाहरुख, आमीर आणि सैफ अली खान एकत्र आले होते.
राव, अशा अनेक कलाकारांनी लहानसहान रोल्स केले आहेत. त्याकाळी हे सिनेमे बघताना मागे गर्दीत नाचणारा/नाचणारी किंवा २ संवाद बोलून निघून जाणारी व्यक्ती एकेदिवशी मोठी स्टार होईल असं वाटलंही नसतं.
राव, अशा कलाकारांची मोठी यादी आहे... चला तर सगळ्यांची ओळख करून घेऊया !!





