पहिली मराठी वेब सीरीज: कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण...

पहिली मराठी वेब सीरीज: कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण...

टीव्हीएफ पिचर्स किंवा पर्मनंट रुममेटसारख्या वेब सिरीज पाहताना “यार असे मराठीत का नाहीए काही??” अशी खंत तुम्हाला जाणवते का? तर आता आली आहे मराठीतली पहिली वेब सीरीज कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण. या वेबसीरीजच्या पहिल्या भागात आहे उत्तम अभिनेत्री राधिका आपटे.

मराठी नाटकक्षेत्रात आपल्या नाटक कंपनी या  नाट्यनिर्मिती संस्थेद्वारे नाव कमावणारा निपुण धर्माधिकारी आणि दिल दोस्ती दुनियादारी  मालिकेत कैवल्यचे काम करणारा अमेय वाघ हे दोघे एक चित्रपट बनवत आहेत आणि त्यासाठी हिरोईनची स्क्रीनटेस्ट घेत आहेत हा या व्हिडिओ चा सिम्पल प्लॉट. हे तिघे मिळून काय धमाल करतात ते बघा इथे  दिलेल्या व्हिडिओ मध्ये.

 

व्हिडिओ सुरवातीला  कळायला काही क्षण लागतात. तसेच काही विनोद ओढून ताणून केलेले आहेत असे वाटले तरी मराठीतला पहिला प्रयत्न म्हणून या कडे नक्कीच पहा.

टॅग्स:

amey waghnipun dharmadhikariwebserismarathi

संबंधित लेख