गेम ऑफ थ्रोन्सची पाच भारतीय कनेक्शन्स..

लिस्टिकल
गेम ऑफ थ्रोन्सची पाच भारतीय कनेक्शन्स..


आजच गेम ऑफ थ्रोन्सचा शेवटचा एपिसोड तुम्ही पाहिला असेलच.. दर सीझनला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शूटिंग चालतं, त्याचेही कदाचित असंख्य फोटोज आणि व्हिडिओजची तुम्ही पाहिले असतील. पण गेम ऑफ थ्रोन्समध्ये भारतीय लोकांचंही योगदान आहे हे तुम्हांला माहित आहे का? ते ही एक दोन नाही, तब्बल पाच गोष्टींमध्ये  भारतीय ठसा आहे.. चला तर मग पाहूयात या पाच गोष्टी काय आहेत ते..

 १. दिल्ली- कपडे, फर्निचर, तयार वेण्या, चिलखतं, तंबू, कशिदाकारी, सेट्स आणि इतर लागणारे सुटे भाग

१. दिल्ली- कपडे, फर्निचर, तयार वेण्या, चिलखतं, तंबू, कशिदाकारी, सेट्स आणि इतर लागणारे सुटे भाग

बापरे, केवढी मोठी यादी आहे.. तर ह सगळा माल पुरवतेय आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगर भागातली रंग्रासन्स नावाची कंपनी. आणि हे आजचं नाही, तर २०११पासूनचं कनेक्शन आहे. तशी ही १९४५ साली सुरू झालेली  कंपनी मिलिटरीतले समारंभाचे कपडे आणि इतर लष्करी पोषाख पुरवायचं काम करते. 
तसं या कंपनीनं घेतलेलं हे पहिलं काम नाही बरं.. यापूर्वी गांधी, कॅप्टन अमेरिका, ग्लॅडिएटर आणि प्रिन्स ऑफ पर्शियासारख्या इतर सिनेमांसाठीही त्यांनी कॉश्चुम्स पुरवल्याचं सांगितलं जात आहे.

२. आमची मुंबई- डेनेरिसचे ड्रॅगन्स- ड्रोगॉन, रहेगार आणि विसेरिऑन

२. आमची मुंबई- डेनेरिसचे ड्रॅगन्स- ड्रोगॉन, रहेगार आणि विसेरिऑन

आश्चर्य वाटलं ना?? 
लॉस एंजेलिसमधल्या प्राना स्टुडिओज या कंपनीच्या मुंबई ऑफिसमध्ये डेनेरिसचे पाचव्या सीझनमधले हे तीनही ड्रॅगन्स बनवण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर पाचव्या सीझनमधले काही सेट्स आणि महाकाय गर्दीची दृश्यंही याच कंपनीनं बनवली आहेत.

३. डेहराडून आणि मीरत-तलवारी आणि सेटवरील इतर वस्तू

३. डेहराडून आणि मीरत-तलवारी आणि सेटवरील इतर वस्तू

जॉन स्नोची लाँगक्लॉ, नेड स्टार्कची आईस, जोफ्रीची विडोज वेल असो की ब्रियन ऑफ टार्थ आणि जेमीची ओथकीपर, या सगळ्या तलवारी इथं डेहराडून आणि मीरतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. इतकंच काय, मालिकेत वापरलेले वलेरियन स्टील डॅगर, हँड ऑफ क्वीनचा ब्रोच हे सगळं विंडलास अँड सन्स आणि लॉर्ड ऑफ बॅटल्स या कंपन्यांनी बनवले आहेत. या सगळ्या वस्तू बनवण्याचं लायसन्स फक्त याच कंपन्यांकडे आहे. 

४. इंदिरा वर्मा

४. इंदिरा वर्मा

इलेरिया सँडचं काम करणारी ही तारका भारतीय वंशाची आहे हे लोकांन माहीत असेलच.. बाथ, युके मध्ये जन्मलेल्या इंदिराचे बाबा भारतीय आहेत. तिचा पहिला सिनेमा 'कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह' यामुळंच ती सर्वांना तशी माहिती झाली होती. सध्या ती गेम ऑफ  थ्रोन्स व्यतिरिक्त रोम, द कँटरबरी टेल्स, ल्यूथर, हयुमन टारगेट, पॅरानोईड अशा मालिकांमध्ये ती चमकलीय.. मात्र आता ती पुढच्या सीझनमध्ये दिसेल असं काही वाटत नाही..

 ५. स्टाझ नायर

५. स्टाझ नायर

खोनो या एका डोथराकी योद्धाचं काम करणारा अभिनेतासुद्धा भारतीय वंशाचा आहे. त्याचे बाबा भारतीय तर आई रशियन आहे. 

टॅग्स:

game of thrones

संबंधित लेख