गिनिज बुकात उच्चांकाची नोंद व्हावी म्हणून लोक धडपडत असतात. पण काहीजणांची नोंद आपोआप होते. बॉलिवूडचे किंवा सिनेसृष्टीचे अनेक उच्चांक असेच नकळत नोंदले गेले आहेत. आज त्यांचाच एक धावता आढावा घेऊया.
१. ब्रह्मानंदम कन्नेगंटी
हे प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन आहेत. तशा यांनी तेलगू सिनेमात जास्त भूमिका केल्या आहेत, पण त्यांचा चेहरा आपल्याला अगदीच अनोळखी नाही. २०१५ मध्ये त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ३० वर्षं झाली नसतील, पण तेव्हा त्यांनी काम केलेल्या भूमिकांची संख्या १००० झाली होती. ब्रह्मानंदम यांच्या नावावर 'सर्वाधिक स्क्रीन क्रेडिट्स असलेला हयात अभिनेता' यासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.









