मुंबई वि. चेन्नई सामन्यात हे खेळाडू करून देऊ शकतात लाखोंची कमाई, पाहा आजच्या सामन्यासाठी बोभाटाची ड्रीम ११

मुंबई वि. चेन्नई सामन्यात हे खेळाडू करून देऊ शकतात लाखोंची कमाई, पाहा आजच्या सामन्यासाठी बोभाटाची ड्रीम ११

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ३३ वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३२ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात १९ वेळेस मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली आहे. तर १३ वेळेस मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. 

हे दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरले आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ वेळेस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्यात यश आले आहे. परंतु आयपीएल २०२२ स्पर्धेत या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करता आली नाहीये. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ६ पैकी ६ सामने गमावले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ पैकी १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स

 रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, टायमल मिल्स, फॅबियन ॲलन, मुर्गन अश्विन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट

 चेन्नई सुपर किंग्ज

 रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, महिश थिक्षणा, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी

अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम :

ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महीश थिक्षणा, ड्वेन ब्रावो, जसप्रीत बुमराह और जयदेव उनाडकट

कर्णधार - सूर्यकुमार यादव

 उपकर्णधार- ऋतुराज गायकवाड