या आठवड्यात रिलीज होतायत हे चित्रपट - तुम्ही कोणता बघणार ? 

लिस्टिकल
या आठवड्यात रिलीज होतायत हे चित्रपट - तुम्ही कोणता बघणार ? 

या आठवड्यात विचारात घेण्यासारखे अवघे तीनच सिनेमे रिलीज होत आहेत. पाहूया हे सिनेमे कशाबद्दल आहेत ते!! तसा तुम्ही एम. एस. धोनी तर पाहाणारच असाल, नाही का?

 

१. डॉट कॉम मॉम 

अमेरिकेत चित्रित झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. आपल्या मुलासोबत अमेरिकेत रहायला गेलेल्या आईची उडणारी तारांबळ आणि या चित्रपटातून विनोदी पद्धतीने दाखवली आहे. चित्रपटाचं थोडं शूटींग व्हाईट हाऊससमोर पण झालंय. मुख्य भूमिकेत विक्रम गोखले आणि विजय चव्हाण असून येत्या शुक्रवारी म्हणजेच 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 

२. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनप्रवासावर आधारीत हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. यामध्ये धोनीच्या भूमिकेत अभिनेता सुशांत सिंग रजपूत दिसणार आहे.
या बायोपिक मध्ये तुम्हाला धोनीच्या आयुष्यातील संघर्ष, आतापर्यंत न उलगडले प्रसंग आणि बरंच काही पहायला मिळेल.

हा सिनेमा बर्‍याच भारतीय भाषांत रिलीज होतोय, अगदी मराठीतसुद्धा. जेव्हा हिंदीचं एक अक्षर कळत नसे तेव्हा आख्खी जनता हिंदी रामायण-महाभारत पाहात होती, आणि आताच्या जमान्यात या निर्माता-दिग्दर्शकांना सिनेमा मराठीत आणायचाय. धन्य आहे!! 

३. एव्हरीबडी वॉन्ट्स सम 

येत्या शुक्रवारी भारतात हा हॉलीवूडपट रिलीज होतोय. हा १९८०दरम्यानच्या कॉलेज बेसबॉल प्लेअर्सवर आधारित हा एक अमेरिकन कॉमेडी चित्रपट आहे.